बुलढाणा, दि. ४ (प्रतिनिधी)
विविध सामाजिक व धार्मिक चळवळींमध्ये योगदान देत आंबेडकरी वैचारिक चळवळीचा समृद्ध वारसा जपणारे सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनियर इंजि. विजय मोरे यांची आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
रिपब्लिकन सेनेचे विदर्भ अध्यक्ष प्रफुल्ल शेंडे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. विजय मोरे यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेसोबतच त्यांनी सामाजिक क्षेत्रात तसेच आंबेडकरी चळवळीत केलेल्या निष्ठावान कार्याची दखल घेण्यात आली.
या नियुक्तीप्रसंगी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते विजय मोरे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी, रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र नेते प्रा. सुनील वाकेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
Users Today : 114