कंचनपूर येथे महाआरोग्य शिबिरास प्रतिसाद

Khozmaster
2 Min Read

खामगाव, दि. ४ (प्रतिनिधी)

तालुक्यातील कंचनपूर येथील आयुष्मान आरोग्य मंदिरामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘सीईओ संग्राम’ अभियानांतर्गत रविवारी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरास ग्रामस्थांसह परिसरातील नागरिक व जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिराचे आयोजन गट विकास अधिकारी चंदनसिंग राजपूत व तालुका आरोग्य अधिकारी अभिलाष खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, सिकलसेल तपासणी, गर्भवती व स्तनदा मातांची तपासणी, ईसीजी तपासणी आदी विविध आरोग्य सेवा नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत ई-केवायसी करून आयुष्मान कार्डचे वाटपही करण्यात आले.

या महाआरोग्य शिबिराचा सुमारे १५० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी पंकज शर्मा, सागर बोडखे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. एम. ए. खान, डॉ. प्रमोद चौरीपगर, आरोग्य सहायक निखिल मानवतकर, विस्तार अधिकारी श्रीमती सोळंके, आरोग्य सेविका एच. एम. शेख, ज्योती गवई, आरोग्य सेवक गजानन चव्हाण, ताले, लॅब टेक्निशियन शंकर बघे, आशा स्वयंसेविका संगीता कस्तुरे व शारदा पारखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच डाटा एंट्री ऑपरेटर आकाश ढोरे, अंगणवाडी सेविका व मदतनीस, बचत गट सीआरपी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

दरम्यान, गट विकास अधिकारी चंदनसिंग राजपूत यांनी शिबिरास भेट देऊन आरोग्य सेवांची पाहणी केली. रुग्णांशी संवाद साधत त्यांनी आरोग्याविषयी मौल्यवान मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा राजपूत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

0 9 4 9 4 2
Users Today : 114
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *