डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार राष्ट्रनिर्मितीचा पाया

Khozmaster
2 Min Read

प्रा. राहुल माहुरे : राष्ट्रीय सेवा योजना शिबिर
अकोला, दि.४ (प्रतिनिधी)

स्थानिक एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विशेष शिबिरामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलताना वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. राहुल माहुरे यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे राष्ट्रनिर्मितीचा पाया आहेत” असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी विचारपीठावर रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. नागनाथ गुट्टे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. मोनिका साबू, प्रा. प्रकाश गवई, प्रा. उज्ज्वला डांगे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण करून करण्यात आली. प्रा. प्रकाश गवई यांनी प्रास्ताविक करत प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला.

यानंतर मार्गदर्शन करताना प्रा. राहुल माहुरे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेबांचे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय योगदान आजही देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रेरणादायी आहे. बाबासाहेबांचा संघर्ष, त्यांनी दिलेला शिक्षणाचा मूलमंत्र तसेच भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीतील अतुलनीय योगदान यावर त्यांनी विविध उदाहरणे व संदर्भांसह सविस्तर भाष्य केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक, राजकीय अभ्यासक, शिक्षणतज्ञ, जलतज्ज्ञ, कृषीतज्ञ, कामगारांचे व स्त्रीमुक्तीचे कैवारी तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. “कितीही विशेषणे लावली तरी त्यांच्या कार्याचा गौरव पूर्ण होणार नाही, इतके ते महान व्यक्तिमत्त्व होते” असेही प्रा. माहुरे यांनी नमूद केले.

बाबासाहेबांनी आयुष्यभर समता व बंधुत्वासाठी लढा दिला. त्यांनी दिलेला “शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा” हा संदेश केवळ पुस्तकी नसून तो जगण्याचा मार्ग आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन कु. पलक उज्जैनकर यांनी तर आभार प्रदर्शन कु. हर्षा घोगरे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच रा.से.यो.चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित हो

0 9 4 9 4 2
Users Today : 114
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *