अजितदादा पवार यांना पातूर येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली

KHOZ MASTER
1 Min Read

पातूर, दि. ४ (प्रतिनिधी)
स्व. अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांना पातूर येथे आयोजित सर्वपक्षीय सभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

येथील विश्रामगृह परिसरात आयोजित या श्रद्धांजली सभेस विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, स्व. अजितदादा पवार यांचे चाहते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी स्व. पवार यांच्या राजकीय, सामाजिक व प्रशासकीय कार्याचा आढावा घेत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

स्व. अजितदादा पवार यांनी जनहितासाठी घेतलेले निर्णय, विकासाभिमुख भूमिका आणि लोकांसाठी केलेले कार्य कायम स्मरणात राहील, असे यावेळी वक्त्यांनी नमूद केले. त्यांच्या निधनाने सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या श्रद्धांजली सभेस जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, हाजी सै. बुऱ्हाण, राजू उगले, सतीश सरोदे, रामा अमानकर, विजय सिंग गहलोत, नंदकिशोर राऊत, ठाकूर शिवकुमार बायस, विजय राऊत, राजेश महल्ले, सुधीर सुरवाडे, संदीप तायडे, गणेश गाडगे, छगन कराळे, शेख अन्सार, प्रदीप काळपांडे, सचिन बारोकार, राजाराम देवकर, हाफिजउल्ला खान, विठ्ठल लोथे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

0 9 7 2 6 8
Users Today : 31
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *