सैलानी, दि. ४ (प्रतिनिधी)
जनता विद्यालय (पिंपळगाव सराई) येथे २ फेब्रुवारी रोजी संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक संजय पीवटे होते. प्रमुख वक्ते म्हणून सुदाम चंद्रे उपस्थित होते. त्यांनी संत रविदास महाराजांच्या जीवनकार्यावर तसेच समाजसुधारणेतील योगदानावर सखोल मार्गदर्शन केले. संत रविदास महाराजांनी समता, बंधुता व मानवतेचा संदेश दिला, असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले
कार्यक्रमाचे संयोजन दिलीप शिंगणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का गवते हिने केले, तर आभार प्रदर्शन सेजल गवते हिने मानले. यावेळी विद्यार्थ्यांनी संत रविदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
हा संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी ठरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
जनता विद्यालयात संत रविदास महाराज जयंती
0
9
4
9
2
4
Users Today : 96
Leave a comment