पातूर, दि. ४ (प्रतिनिधी)
महाराज शहरात मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सदगुरू समर्थ मुंगसाजी महाराज पालखीचे संत सेवालाल सभागृहात अत्यंत भक्तिभावाने व विधिवत स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या श्रद्धा व उत्साहात संपन्न झाला.
निंबी चलका ते शेगाव असा दिंडी प्रवास करणाऱ्या या पालखीचा पातूर येथे मुक्काम होता. पालखी शहरात दाखल होताच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. पारंपरिक पद्धतीने पूजा, आरती व मंत्रोच्चार करण्यात येऊन संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाने करण्यात आला.
या पालखी सोहळ्याचे दिंडी प्रमुख महादेव गोविंदराव करवते यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच चेलका येथील सरपंच अरविंद जाधव व सौ. अर्चना जाधव यांनी सापत्नीक त्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला येथील स्टार गायक कलावंत कराओके ग्रुपच्या वतीने भक्तीगीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केशव मुसळे, अतुल अरबाड, विनोद भाऊ इंगळे, नामदेव जाधव सर, पवन करवते, विनोद भाऊ हिवरकर, अनिकेत खामखेड, सरपंच विठ्ठल काळे, सतीश सरोदे, वाडेकर सर, प्रवीण सरप, महल्ले काका, लाहोळे काका यांच्यासह अनेक भाविकांनी परिश्रम घेतले.
सर्व भाविकांनी सहकार्य केल्यामुळे पालखी स्वागत व महाप्रसाद कार्यक्रम अत्यंत शांततामय वातावरणात व यशस्वीरीत्या पार पडला.
मुंगसाजी महाराज पालखीचे स्वागत
0
9
4
9
2
4
Users Today : 96
Leave a comment