अजितदादांच्या अस्थीकलशाचे शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले दर्शन

Khozmaster
2 Min Read

मानोरा, दि. ४ (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची अस्थिकलश विसर्जन यात्रा २ फेब्रुवारी रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाली. यावेळी शेकडो कार्यकर्ते व दादांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी पवित्र अस्थिकलशाचे भावपूर्ण दर्शन घेतले.
कारंजा लाड येथून २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी स्व. अजितदादा पवार यांची अस्थिकलश विसर्जन यात्रा मानोरा शहरात पोहोचली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समर्थकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.
या अस्थिकलश विसर्जन यात्रा कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंतराव इंगळे, राम ठाकरे, बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे, उमेश ठाकरे, डॉ. अविनाश लोथे, भाजपाचे अरविंद इंगोले, राजू देशमुख, निळकंठ पाटील, डॉ. अरविंद यावलकर, देवनाथ भोयर, डॉ. सुहास देशमुख, डॉ. श्याम जाधव, पप्पूशेठ हेडा, मनोहर पाटील, ठाकूरसिंग चव्हाण, निलेश पाटील, गोपाल भोयर, वसंता राठोड, सचिन रोकडे, सुनील गावंडे, अन्वर पटेल, सुभाष राठोड, राजू गुल्हाने, अतुल पाटील, सुधाकर चौधरी, प्रा. गणेशराव भोयर, किसनराव शिंदे, गोविंदराव म्हातारमारे, कादर शेठ लंगा, धनंजय वानखडे, आतिक भाई, सतीश म्हातारमारे, बबलू शेख, संजय भुजाडे, अरविंद राऊत, विलास पाटील, किशोर लावरे, सुभाष चौधरी, गजानन भवाने, नरेंद्र राऊत, चिंतामण खुळे, विनय पडवाल, खुशाल राठोड, पवन चव्हाण, रवी दिघडे, संजीव राऊत, नितीन पाटील, विठ्ठल राऊत, बाळू वानखडे, निरंजन राऊत, जगदीश गावंडे, गजानन मोरकर, सुमेध खडसे आदींसह महायुती व महाविकास आघाडीतील पदाधिकारी तसेच स्व. अजितदादा पवार यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 9 2 3
Users Today : 95
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *