नवी दिल्ली प्रतिनिधी :
आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्यासोबत अत्यंत फलदायी बैठक पार पडली. अर्थसंकल्प २०२६ मध्ये आयुष मंत्रालयासाठी जाहीर करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण घोषणा व दूरदृष्टीपूर्ण तरतुदींकरिता यावेळी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
या बैठकीत आयुष क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासोबत संशोधन, शिक्षण, आधुनिक सुविधा आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. आयुष पद्धती अधिक प्रभावी व लोकाभिमुख करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही नमूद करण्यात आले.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आरोग्य क्षेत्रात विविध सुधारणा आणि नव्या योजना राबविण्यात येत असून, त्याचा थेट फायदा देशातील नागरिकांना होत आहे. आयुष क्षेत्रातील नव्या उपक्रमांमुळे समग्र आरोग्य सेवा, संशोधन आणि उपचार पद्धतींना मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या निर्णयांमुळे विकसित भारत घडवण्याच्या संकल्पाला अधिक बळ मिळणार असून, पारंपरिक आणि आधुनिक आरोग्य व्यवस्थेचा समतोल साधण्यास मदत होणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत फलदायी बैठक; आयुष क्षेत्राला अर्थसंकल्पातून मोठी चालना
0
9
4
9
2
3
Users Today : 95
Leave a comment