कर्तव्य भवनात NHM व NAM संदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक

Khozmaster
1 Min Read

नवी दिल्ली प्रतिनिधी :
कर्तव्य भवन-१, नवी दिल्ली येथे आज राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि राष्ट्रीय आयुष अभियान (NAM) संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, आयुष मंत्रालय तसेच महाराष्ट्र शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान देशातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, आयुष उपचार पद्धतींचा विस्तार, ग्रामीण व शहरी भागात दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच आरोग्य यंत्रणेचे आधुनिकीकरण या मुद्द्यांवर व्यापक चर्चा करण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सेवा पोहोचविणे हेच या बैठकीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली ‘स्वस्थ भारत, सशक्त भारत’ हे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र व राज्य शासन समन्वयाने कार्य करत आहेत. निरोगी महाराष्ट्र आणि विकसित भारत घडविण्याच्या दिशेने आरोग्य व आयुष क्षेत्रातील विविध योजनांना अधिक बळ दिले जाणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला

0 9 4 9 2 3
Users Today : 95
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *