गरूळ नवघरे प्रतिनिधी :
मंगरूळ नवघरे येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेला आज आयएसओ पुरस्कार प्रदान करण्यात आला. याचबरोबर शाळेमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या बाल वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
लोकसहभागातून डिजिटल झालेली ही शाळा परिसरासाठी आदर्श ठरत असून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण पद्धतीची सुविधा उपलब्ध झाली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, डिजिटल साधनांचा वापर आणि विद्यार्थीकेंद्री उपक्रमांमुळे येथून उद्याचे गुणवंत विद्यार्थी घडत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी शाळेतील शिक्षकवृंद, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिकांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच शाळेच्या पुढील विकासासाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे आश्वासन देण्यात आले.
मंगरूळ नवघरे शाळेला आयएसओ पुरस्कार; बाल वाचनालयाचे उद्घाटन
0
9
4
9
2
3
Users Today : 95
Leave a comment