एकलारा प्रतिनिधी :
मौजे एकलारा येथील प्रसिद्ध देवस्थान श्री किसनदेव महाराज संस्थान येथे भक्तांच्या सोयीसाठी ‘ब’ वर्ग अंतर्गत २ कोटी रुपयांच्या डोम सभामंडप व भक्तनिवास बांधकामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. या कामामुळे येणाऱ्या भाविकांना निवास व दर्शन व्यवस्थेमध्ये मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
पर्यटन स्थळ विकास योजनेअंतर्गत यापूर्वीच १ कोटी रुपयांच्या निधीतून संरक्षक भिंत व कार्यालयाचे काम पूर्ण करण्यात आले असून संस्थान परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढेही प्रयत्न सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप प्रकाश महाराज जवंजाळ होते. यावेळी संस्थानचे अध्यक्ष विष्णू झगरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजुभाऊ गाडेकर, बबनराव राऊत, शंकरराव तरमळे, सुनील बिलारी, दीपक पाटील म्हस्के, लक्ष्मणराव अंभोरे, दिनकरराव अंभोरे, प्रदीप टेकाळे, कडुबा खरात, मनोज कुटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
तसेच पाटोदा सरपंच प्रदीप सोळंकी, एकलारा सरपंच संगीताताई झगरे, गजानन अंभोरे, किशोर सोळंकी, गजानन सोळंकी, अनिल अंभोरे, आमखेड सरपंच जगन्नाथ वाघ, बंदुभाऊ अंभोरे, तेजराव पाटील, रामकृष्ण अंभोरे, सुधाकर अंभोरे, सतीश काकडे, बद्री पानगोळे, तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर, संस्थान उपाध्यक्ष रामदास मोरे, मंडळ अधिकारी अरविंद शेळके, रमेश आकाळ तसेच संचालक मंडळ सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विकासकामांमुळे एकलारा येथील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून परिसराच्या आर्थिक व सामाजिक विकासालाही मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
एकलारा येथे २ कोटींच्या डोम सभामंडप व भक्तनिवासाचे भूमिपूजन
0
9
4
9
2
3
Users Today : 95
Leave a comment