आधुनिक यंत्रसामुग्रीने शेतीला बळ; आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वितरण

Khozmaster
1 Min Read

चिखली प्रतिनिधी :
चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांना आधुनिक शेतीची जोड मिळावी तसेच उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत आज ७ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. हा वितरण सोहळा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
या योजनेअंतर्गत लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना १ लाख २५ हजार रुपये तर इतर पात्र शेतकऱ्यांना १ लाख रुपये अनुदान शासनाकडून दिले जाते. ट्रॅक्टरसह विविध कृषी अवजारे, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्रे आदींसाठी देखील या योजनेत अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे.
याप्रसंगी आमदार श्वेता महाले पाटील म्हणाल्या की, “शेती अधिक आधुनिक व स्पर्धात्मक करण्यासाठी यांत्रिकीकरण अत्यंत आवश्यक आहे. शासनाच्या विविध कृषी योजनांचा जास्तीत जास्त लाभ शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवून त्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.”
या वेळी एकलारा येथील मधुकर माणिकराव अंभोरे, रामेश्वर बबन शिंदे, रामेश्वर साहेबराव अंभोरे, पाटोदा येथील संकेत रमेश भुसारी, पांढरदेव येथील समाधान मधुकर म्हस्के, जांभरून येथील शेख अल्ताफ शेख इस्माईल आणि बोरगाव काकडे येथील गजानन हरिभाऊ काकडे या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.
शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे सोपे होत असून उत्पादनवाढीस मोठी मदत होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

0 9 4 9 2 3
Users Today : 95
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *