लढाणा प्रतिनिधी :
बुलढाणा जिल्हा परिषद आयोजित अधिकारी-कर्मचारी सांस्कृतिक स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी उपस्थितांना एक हृदयस्पर्शी क्षण अनुभवायला मिळाला. शॅडो ॲक्टच्या माध्यमातून सहभागी कलावंतांनी स्वर्गीय अजित पवार यांना आगळीवेगळी आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, ग्रामीण प्रकल्प बुलढाणा यांच्या कलावंत संचाने सादर केलेल्या या शॅडो ॲक्टमध्ये स्व. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री म्हणून राबविलेल्या विविध महत्त्वपूर्ण योजनांचा प्रभावी आढावा घेण्यात आला. तसेच त्यांच्या जीवनप्रवासातील काही महत्त्वपूर्ण घटना आणि दुर्दैवी विमान अपघाताचा प्रसंग अत्यंत संवेदनशीलतेने सादर करण्यात आला.
या सादरीकरणामुळे सभागृहातील वातावरण भावनिक झाले असून अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. कला, भावना आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी सादरीकरणाबद्दल सर्व कलावंतांचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमातून दिवंगत नेत्याच्या कार्याची आठवण ताजी ठेवत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जिल्हा परिषद सांस्कृतिक स्पर्धेत शॅडो ॲक्टमधून स्व. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
0
9
4
9
2
4
Users Today : 96
Leave a comment