डोणगाव प्रतिनिधी :
डोणगाव येथून जवळच असलेल्या बेलगाव येथे स्व. काशिनाथ महादजी वानखेडे यांच्या १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या रक्तदान शिबिराचे आयोजन अँड. सुरेशराव वानखेडे, सुधीरभाऊ वानखेडे, सतिषभाऊ वानखेडे तसेच संदीपराव वानखेडे यांच्या वतीने करण्यात आले होते. शिबिरासाठी माजलगाव रक्तदान केंद्र, माजलगाव येथील पथक उपस्थित होते. यामध्ये डॉ. मोहन गायकवाड, डॉ. संदेश राठोड, डॉ. संदीप राठोड, तंत्रज्ञ डॉ. प्रिती गायकवाड व डॉ. संजय पुजांजी वानखेडे तसेच दीनकरराव बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तसंकलन करण्यात आले.
या शिबिरात एकूण २१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. कार्यक्रमाची सुरुवात गावातील प्रतिष्ठित नागरिक ज्ञानेश्वर माऊली वानखेडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक विजय जाधव, सुभाष वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान डॉ. संदेश राठोड यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून देत रक्तदानामुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात आणि हे एक महान पुण्यकर्म असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद मेटांगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक दीपक कुटे यांनी केले.
बेलगाव येथे २१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
0
9
4
9
2
3
Users Today : 95
Leave a comment