लोणारमधून १३ वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण मामाच्या गावाला गेलेला वैभव परतलाच नाही

Khozmaster
2 Min Read

लोणार, दि. ५ (प्रतिनिधी):
बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, गेल्या सात दिवसांत तब्बल १३ बेपत्ता घटनांची नोंद झाल्याने जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणार पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
एका घटनेत १३ वर्षांच्या चिमुरडीचे मिठाईचे आमिष दाखवून अपहरण करण्यात आले असून, दुसऱ्या घटनेत मामाच्या गावाला निघालेला तरुण अचानक बेपत्ता झाला आहे.
उल्कानगरी म्हणून जगविख्यात असलेल्या लोणार शहरातील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या दिपाली सुनील शिंदे (वय २७) यांच्या १३ वर्षीय भाची आंचल कृष्णा सोळंके हिला अज्ञात इसमाने फेब्रुवारी रात्री ११.३० ते ४ फेब्रुवारी सकाळी या वेळेत फूस लावून पळवून नेले. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने मुलीला खोटेनाटे आमिष दाखवून तिचे अपहरण केले.
या प्रकरणी दिपाली शिंदे यांच्या फिर्यादीवरून लोणार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनाली गर्जे करत आहेत.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत येवती (ता. लोणार) येथील वैभव शंकर नागरे (वय २५) हा फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता देऊळगाव राजा येथे मामाच्या घरी जातो असे सांगून घरातून निघाला. मात्र तो मामाच्या गावाला पोहोचलाच नाही तसेच घरीही परत आला नाही.
या प्रकरणी वैभवचे वडील शंकर भागाजी नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणार पोलिसांनी हरवल्याची नोंद घेतली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार गजानन सानप करीत आहेत.
अल्पवयीन मुलींचे अपहरण आणि तरुणांचे अचानक बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित व्यक्तींबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन लोणार पोलिसांनी केले आहे.

0 9 4 8 9 1
Users Today : 63
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *