मृद्धी महामार्गावर ट्रकची वाहनाला धडक; एक ठार

Khozmaster
1 Min Read

डोणगाव, दि. ५ (प्रतिनिधी):
समृद्धी महामार्गावरील भारत पेट्रोल पंपासमोर ट्रक व अज्ञात वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात ४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.
प्राप्त माहितीनुसार, जनकलाल शामराव चिलाटे (वय २८, रा. कालवा, ता. आटनेर, जि. बैतुल, मध्यप्रदेश), सुखदेव बारसकर (रा. ऐनखेड, पोस्ट काकली दामोना, बैलकुंद, जि. बैतुल, मध्यप्रदेश) तसेच ट्रकचालक नारायण रावसाहेब ठेंग (रा. खंडाळा, मकरध्वज, ता. चिखली, जि. बुलढाणा) हे टाटा कंपनीच्या ट्रकमधून (क्रमांक एमएच-२८-बीबी-५४४४) लोखंडी टिनशेडचे पोल घेऊन चिखली येथून मेहकरमार्गे कारंजा लाडकडे जात होते.
समृद्धी महामार्गावरील नागपूर लेनमध्ये चॅनल क्रमांक २६९ जवळ भारत पेट्रोल पंपासमोर ट्रकचालकाने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली.
या अपघातात ट्रकमध्ये बसलेले सुखदेव बारसकर यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी संबंधित ट्रकचालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

0 9 4 8 9 1
Users Today : 63
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *