वृद्ध महिलेला चाकूच्या धाकावर लुटणारे दोन चोरटे पकडले एका महिला आरोपीसह तिघे फरार; १३ लाखांचा ऐवज लंपास

Khozmaster
2 Min Read

साखरखेर्डा, दि. ५ (प्रतिनिधी):
हनवतखेड येथे ९२ वर्षीय वयोवृद्ध महिलेच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत दागिने लुटल्याची घटना २९ जानेवारी रोजी रात्री घडली होती. या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी तात्काळ तपास करून दोन आरोपींना अटक केली असून, एका महिला आरोपीसह दोन पुरुष आरोपी फरार आहेत.
साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हनवतखेड येथील सुमन श्रीराम चव्हाण (वय ९२) या महिला २९ जानेवारी रोजी रात्री घरी एकट्याच असताना तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील किचनरूमचा दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला.
आजी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील हातातील, कानातील, नाकातील व गळ्यातील दागिने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आजीला जाग आल्यावर त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली.
चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने असा एकूण सुमारे १३ लाख रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. तसेच घरातील ३२ इंची टीव्ही व रिसीव्हर घराबाहेर नेऊन ठेवण्यात आला होता.
या प्रकरणी अनिल चव्हाण यांनी साखरखेर्डा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान ठाणेदार गजानन करेवाड व त्यांच्या पथकाने कारवाई करून करण एकनाथ वंजारे (रा. खेर्डा, ता. मालेगाव) आणि मनोज मोहन इंगळे (रा. सुकंडा, ता. मालेगाव, जि. वाशिम) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला काही ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील एक महिला आरोपीसह दोन पुरुष आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

0 9 4 8 9 1
Users Today : 63
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *