मेहकर, दि. ५ (प्रतिनिधी):
स्व. अजितदादा पवार हे अत्यंत निर्भीड आणि स्पष्ट भूमिका घेणारे खमके राजकारणी होते. त्यांची काम करण्याची वेगळी शैली होती. त्यांच्या सोबत अनेक वेळा काम करण्याची संधी मिळाली असून त्यांचे कार्य मी जवळून पाहिले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक चांगला आणि दूरदृष्टीचा नेता गमावला आहे, अशी भावूक प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त करत स्व. अजितदादांना श्रद्धांजली वाहिली.
आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी अजितदादांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करत शब्दरूपी श्रद्धांजली अर्पण केली.
या शोकसभेत उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, डॉ. नंदकिशोर गारोळे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख सागर पाटील यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.
यावेळी तालुका प्रमुख निंबा पांडव, संदिप गारोळे, बोरी सर्कल प्रमुख अमोल बोरे, दत्ता घनवट, ऋषिकेश जगताप, रमेश देशमुख, गबाजी गवई, अजयदीप खडसे, रवींद्र वाघ, देवानंद वानखेडे, भागवत बोरकर यांच्यासह वडगावमाळी येथील महिला मंडळानेही श्रद्धांजली वाहिली.
शोकसभेचे संपूर्ण वातावरण अत्यंत भावनिक असून उपस्थितांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
महाराष्ट्राने दूरदृष्टीचा नेता गमावला : आ. सिद्धार्थ खरात
0
9
4
8
9
1
Users Today : 63
Leave a comment