म. ज्यो. फुले मागासवर्गीय वसतिगृहात कुष्ठरोग तपासणी मोहीम राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत विशेष सर्वेक्षण

Khozmaster
2 Min Read

देऊळगाव घुबे, दि. ५ (प्रतिनिधी):
येथील महात्मा ज्योतीबा फुले मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, जिल्हा बुलढाणा अंतर्गत कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र व स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२५-२६ अंतर्गत कुष्ठरुग्णांसाठी विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र शेळगाव आटोळ अंतर्गत देऊळगाव धनगर येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी शेळगाव आटोळचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वायाळ, देऊळगाव घुबे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आश्विनी इंगळे, आरोग्य सहाय्यक डॉ. एल. जी. भुतेकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमेश्वर परीहार, आरोग्य सेवक प्रमेश्वर मीसाळ, आरोग्य सेविका, आशा सेविका तसेच वसतिगृहाचे अध्यक्ष शेणफडराव घुबे, प्राचार्य हरीदास घुबे, वसतिगृह अधीक्षक राजेंद्र घुबे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्वप्रथम मोहीम राबविण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. वंचित व दुर्लक्षित घटकांमध्ये वीटभट्टी कामगार, खदान कामगार, स्थलांतरित व्यक्ती, बांधकाम मजूर, निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी, कंपनीतील कामगार यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
हे लोक कामासाठी लवकर घराबाहेर पडतात आणि उशिरा परत येतात. त्यामुळे त्यांची आरोग्य तपासणी नियमित सर्वेक्षणात किंवा कुष्ठरोग शोध मोहिमेत होत नाही. म्हणूनच या विशेष मोहिमेसाठी आश्रमशाळा व वसतिगृहांची निवड करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
तसेच कुष्ठरोग हा अनुवंशिक नसून, तो मागील जन्माचे पाप, देवाचा शाप किंवा कोणत्याही अंधश्रद्धेशी संबंधित नाही, असेही मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच उपलब्ध उपचार पद्धती व प्रतिबंधात्मक उपायांबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली.

0 9 4 8 9 1
Users Today : 63
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *