मोताळा, दि. ५ (प्रतिनिधी):
स्थानिक सहकार विद्या मंदिर, मोताळा येथे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या समारंभात दहावीचे विद्यार्थी भावूक झाले होते. कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता ९ वीचे विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अभिजीत देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक अशोक राहाणे तसेच पर्यवेक्षक उमेश माळी उपस्थित होते.
यावेळी दहावीच्या विद्यार्थिनी वेदांती पाटील, भाग्यश्री राजपूत, संजना मगरे, प्रगती चोपडे, अंजली जवरे, कोमल देशमुख आणि दिशा चौधरी यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.
तसेच शिक्षकांनीही समायोचित मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये शिक्षिका निकिता खोडके, राजू वखरे, मंगेश सातव आणि विकास पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी संदेश दिला.
वैभव खराटे यांनी आपल्या भाषणातून शालेय जीवनातील संस्कार आणि गुरु-शिष्य नात्याचे महत्त्व विशद केले. संगीत शिक्षक मुकुल मोरे यांनी सुमधुर गीत सादर केले. तसेच मुख्याध्यापक अभिजीत देशमुख यांनी “जीना यहाँ मरना यहाँ” हे गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
मुख्याध्यापक देशमुख यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, शाळा हे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून संस्कारांची शिदोरी आहे. येथे मिळालेले संस्कार जपत पुढे जाऊन देशाचे सुजाण नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा हरमकार, गायत्री सातपुते, साक्षी पूर्भे आणि अश्विनी सायखेडे या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांतर्फे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना आठवण म्हणून भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
सहकार विद्या मंदिरात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात
0
9
4
8
9
1
Users Today : 63
Leave a comment