कौशल्य विकास कार्यशाळेचे उद्घाटन ‘सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट’ विषयावर चार दिवसीय कार्यशाळेला प्रारंभ

Khozmaster
2 Min Read

पिंपळगाव काळे, दि. ५ (प्रतिनिधी):
बापूमिया जळगाव जामोद सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपळगाव काळे येथे ‘सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट’ या विषयावर आधारित चार दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळेचे उद्घाटन दिनांक ५ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शत्रुघ्न जाधव यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सलीम पटेल, सहसचिव रब्बानी देशमुख, उपाध्यक्ष प्रा. कय्यूम पटेल, संचालक सिराजोद्दीन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. शत्रुघ्न जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, या कार्यशाळेचा उपयोग विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी करिअरच्या दृष्टीने निश्चितच होणार असून, रोजगार व व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स अत्यंत महत्त्वाचे आहेत.
ही चार दिवसीय कार्यशाळा विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत विद्यापीठ नियुक्त प्रशिक्षक विविध सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणार आहेत.
विद्यापीठ नियुक्त प्रशिक्षक डॉ. उमेश चापके यांनी विद्यार्थ्यांना मौखिक संवाद आणि गैर मौखिक संवाद या विषयांवर मार्गदर्शन केले. पुढील तीन दिवसांमध्ये ग्रुप डिस्कशन, रिझ्युम रायटिंग स्किल, इंटरव्यू स्किल, टाईम मॅनेजमेंट, गोल सेटिंग, प्रेझेंटेशन, मोटिवेशन, कॅरेक्टर एथिक्स आणि मॉरल यासारख्या विषयांवर विविध प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. बाबाराव सांगळे यांनी केले.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. शेख फराह, प्रा. महेश नेतनासकर, डॉ. नूर मोहम्मद, डॉ. चेतन पलन, डॉ. निखिल अग्रवाल, डॉ. आनंद जाधव, प्रा. मनोहर जांभळे, प्रा. नितीन आसोले, डॉ. शकील खान, डॉ. प्राजक्ता बाठे, डॉ. दिपाली सिरसाठ, प्रा. सय्यद जोया, गजानन इंगळे, डॉ. गजानन भोपळे, शेख अफरोज, विशाल दाणे, परेश अवचार, अमोल देवकर, सागर बाहादरे, सागर खांदे, साजिद देशमुख, जुबेर खान, शेख जुबेर, आशिष इंगळे, अक्षय तायडे, वसीम देशमुख यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
.

0 9 4 8 9 1
Users Today : 63
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *