हुंडा आणि सासरचा छळ आजही अनेक महिलांसाठी मृत्यूचे कारण ठरत असल्याची आणखी एक दुर्दैवी घटना वडाळी (ता. नांदुरा) येथे घडली आहे. पंधरा वर्षांपासून शारीरिक व मानसिक त्रास सहन करत असलेल्या वर्षा जयंत वक्टे (३५) यांनी अखेर विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. “माहेरून पैसे आण” आणि “शेतीचा हिस्सा आमच्या नावावर कर” अशा तगाद्यामुळे तिचे आयुष्य वेदनादायी झाले होते.
या घटनेने समाजातील हुंडाबळी मानसिकतेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत कठोर अंमलबजावणीची गरज अधोरेखित केली आहे. नांदुरा पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
नांदुरा, दि. ५ (प्रतिनिधी)
0
9
4
8
9
1
Users Today : 63
Leave a comment