मेहकरात ‘श्रीं’चा प्रगटदिन महोत्सव उत्साहात साजरा होणार! ८ फेब्रुवारीला लघुरुद्र अभिषेक, प्रवचन, महाआरती व महाप्रसाद वितरण मान्यवरांचा सत्कार व वृक्षारोपण कार्यक्रमाचेही आयोजन

Khozmaster
1 Min Read

मेहकर, दि. ५ (प्रतिनिधी)
मेहकर येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने ‘श्रीं’चा प्रगटदिन महोत्सव दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.

संत गजानन महाराज सेवा समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्र.काँ.क.चे सरचिटणीस श्याम उमाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ ते १० वाजता ‘श्रीं’च्या लघुरुद्र अभिषेकाने होणार असून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडणार आहे. सकाळी १० वाजता ह.भ.प. देवदत्त महाराज पितळे यांचे प्रवचन होईल. सकाळी ११ वाजता मान्यवरांचा सत्कार, दुपारी १२ वाजता सामूहिक जप व महाआरती, तर दुपारी १२.१५ वाजता महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.

या महोत्सवाला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेवा समितीचे उपाध्यक्ष सुदेश लोढे, सुरेश मुंदडा, कोषाध्यक्ष घनश्याम जोशी, सहसचिव भूषण मीनासे आणि सचिव गोपाल पाखरे यांनी केले आहे.

0 9 4 8 9 1
Users Today : 63
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *