माझोड-तांदळी-बाभूळगाव रस्त्याची दुरवस्था, नागरिक त्रस्तमाझोड-तांदळी-बाभूळगाव रस्त्याची दुरवस्था, नागरिक त्रस्त

Khozmaster
5 Min Read

चतारी, दि. ५ (प्रतिनिधी):
माझोड-तांदळी-बाभूळगाव या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून हा रस्ता अकोला व बुलढाणा या दोन जिल्ह्यांना जोडणारा जवळचा व महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्यावरून पातूर तालुक्यातील अनेक नागरिक, विद्यार्थी तसेच व्यापारी वर्ग अकोला जिल्हा मुख्यालयावर नियमित ये-जा करतात. परंतु खड्डे, तुटलेला डांबराचा थर व खराब रस्ता यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. काही वाहन चालक खराब रस्त्यामुळे अकोला जाण्यासाठी पातूर किंवा वाडेगाव मार्गे पर्यायी मार्गांचा वापर करीत आहेत.

खराब रस्त्यामुळे काही अपघातही झाल्याचे सांगण्यात येत असून यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

डायलिसिस रुग्णाला मोठा त्रास

तांदळी बु. येथील किडनीग्रस्त रुग्ण मोहन दिगंबर धोत्रे यांनी सांगितले की,
“आठवड्यातून दोन दिवस डायलिसिससाठी बाहेर जावे लागते. मात्र रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे जाणे-येणे फार त्रासदायक झाले आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी.”

निधी मंजूर, टेंडर होऊनही काम रखडले

या रस्त्यासाठी खासदारांनी वर्षभरापूर्वी निधी मंजूर करून आणल्याचे सांगण्यात येते. तसेच तीन महिन्यांपूर्वी टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची चर्चा आहे. मात्र तरीदेखील प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.

महिलांचा रस्ता रोकोचा इशारा

शिवसेना पातूर तालुका प्रमुख महिला आघाडी सपना नवले यांनी सांगितले की,
“माझोड-तांदळी-बाभूळगाव रस्त्याचे काम लवकर सुरू न झाल्यास परिसरातील महिला रस्ता रोको आंदोलन करतील.”

दरम्यान, शिवसेना तालुका अध्यक्ष बालूभाऊ उर्फ अनंत बागडे यांनीही रस्त्याचे काम तातडीने सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.माझोड-तांदळी-बाभूळगाव रस्त्याची दुरवस्था, नागरिक त्रस्त

चतारी, दि. ५ (प्रतिनिधी):
माझोड-तांदळी-बाभूळगाव या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून हा रस्ता अकोला व बुलढाणा या दोन जिल्ह्यांना जोडणारा जवळचा व महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्यावरून पातूर तालुक्यातील अनेक नागरिक, विद्यार्थी तसेच व्यापारी वर्ग अकोला जिल्हा मुख्यालयावर नियमित ये-जा करतात. परंतु खड्डे, तुटलेला डांबराचा थर व खराब रस्ता यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. काही वाहन चालक खराब रस्त्यामुळे अकोला जाण्यासाठी पातूर किंवा वाडेगाव मार्गे पर्यायी मार्गांचा वापर करीत आहेत.

खराब रस्त्यामुळे काही अपघातही झाल्याचे सांगण्यात येत असून यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

डायलिसिस रुग्णाला मोठा त्रास

तांदळी बु. येथील किडनीग्रस्त रुग्ण मोहन दिगंबर धोत्रे यांनी सांगितले की,
“आठवड्यातून दोन दिवस डायलिसिससाठी बाहेर जावे लागते. मात्र रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे जाणे-येणे फार त्रासदायक झाले आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी.”

निधी मंजूर, टेंडर होऊनही काम रखडले

या रस्त्यासाठी खासदारांनी वर्षभरापूर्वी निधी मंजूर करून आणल्याचे सांगण्यात येते. तसेच तीन महिन्यांपूर्वी टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची चर्चा आहे. मात्र तरीदेखील प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.

महिलांचा रस्ता रोकोचा इशारा

शिवसेना पातूर तालुका प्रमुख महिला आघाडी सपना नवले यांनी सांगितले की,
“माझोड-तांदळी-बाभूळगाव रस्त्याचे काम लवकर सुरू न झाल्यास परिसरातील महिला रस्ता रोको आंदोलन करतील.”

दरम्यान, शिवसेना तालुका अध्यक्ष बालूभाऊ उर्फ अनंत बागडे यांनीही रस्त्याचे काम तातडीने सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

0 9 4 8 7 8
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *