मनपा शाळेत इनरव्हील क्लबकडून पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली

Khozmaster
1 Min Read

अकोला, दि. ५ (प्रतिनिधी):
इनरव्हील क्लब ऑफ अकोला कवीन यांच्या वतीने कृषीनगर परिसरातील क्लबच्या दत्तक मनपा मराठी शाळा क्रमांक १६ मध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सोयीसाठी पाण्याची टाकी, वॉटर प्युरिफायर तसेच तीन वॉशबेसिन बसविण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांची दैनंदिन गरज लक्षात घेता क्लबने पुढाकार घेत हा सेवाभावी व रचनात्मक उपक्रम साकार केला. यामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून स्वच्छता राखण्यासही मदत होणार आहे.

हा उपक्रम इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष सौ. कविता पोहरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. ‘ऑफिशियल चेअरमन व्हिजिट’ कार्यक्रमाच्या निमित्ताने इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३०३ च्या चेअरपर्सन रमा गर्ग यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी हरीचंद्र इटकर, मुख्याध्यापिका मीना देशमुख तसेच क्लबच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

क्लब अध्यक्ष सौ. कविता पोहरे यांनी माहिती देताना सांगितले की, कवीन क्लबचा ‘हॅपी स्कूल’ हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होत असून त्याचा प्रारंभ डीसी रमा गर्ग यांच्या हस्ते करण्यात आला. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळेल तसेच आरोग्यदायी व स्वच्छ जीवनशैली अंगीकारण्यास प्रोत्साहन मिळेल.

या प्रकल्पासाठी रोटरी क्लब ऑफ अकोला सेंट्रल यांचे सहकार्य लाभले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी सचिव स्वीटी राठी, उपाध्यक्ष पल्लवी दिवेकर, माजी अध्यक्ष रुची रुहाटीया, आयएसओ हरसीमरण जनेजा, सीसी अंकिता सोनी, सदस्य दीप्ती अग्रवाल, एकता अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

0 9 4 8 7 8
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *