कारंजा (प्रतिनिधी):
फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेच्या प्रसारासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले तसेच बहुजन समाजातील शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून दिशा देणारे प्रा. रमेश वरघट व आशा वरघट हे दाम्पत्य समाजासाठी आदर्श ठरत आहे. सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी समर्पित केले आहे.
स्वतः अपत्य नसतानाही बहुजन समाजातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना आधार देत, त्यांचे शिक्षण, प्रबोधन व सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी सातत्याने कार्य केले. समाजप्रबोधनाचे कार्य मृत्यूनंतरही सुरू राहावे, या उदात्त भावनेतून प्रा. रमेश वरघट व आशा वरघट यांनी देहदान करण्याचा संकल्प जाहीर केला आहे.
फुले, शाहू, आंबेडकरांच्या समता, न्याय व मानवतावादी विचारांचा प्रभाव त्यांच्या संपूर्ण जीवनकार्यावर दिसून येतो. प्रा. रमेश वरघट यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून सेवा बजावताना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच संविधानिक मूल्ये रुजविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानातून अनेक विद्यार्थी घडले असून आज ते समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
या देहदानाच्या निर्णयाचे समाजातील विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून अनेक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी व नागरिकांनी वरघट दाम्पत्याच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.
देहदानाच्या या प्रेरणादायी संकल्पामुळे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद तसेच सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
वरघट दाम्पत्याचा देहदानाचा कौतुकास्पद संकल्प समाजातील बहुजनांनी आदर्श घेण्याचे आवाहन
0
9
4
8
7
8
Users Today : 50
Leave a comment