अकोला, दि. ५ (प्रतिनिधी):
श्रीमद्भागवताची निर्मिती ही भूतलावरील सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी झाली असून जो भक्त नित्य भागवत श्रवण करतो, त्यास प्रभूची कृपा प्राप्त होऊन शाश्वत सुख मिळते, असा उपदेश बुलढाणा येथील ह.भ.प. मंगेश महाराज वराडे यांनी केला.
खडकी परिसरातील धाबेकर नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराज प्रगटदिन महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित श्रीमद्भागवत कथेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कृष्णकथेच्या माध्यमातून भागवत कथेतून भक्तांना जीवनमूल्यांचा संदेश दिला.
कृष्णलीलांचे वर्णन सुरू असताना मातृशक्तीने जल्लोषपूर्ण सामूहिक नृत्य करत भक्तिमय वातावरण निर्माण केले. त्यानंतर सामूहिक आरतीने या सत्राची सांगता झाली.
भागवत कथा व कीर्तनाचे वेळापत्रक
उत्सवात दररोज सकाळी १० ते दुपारी १ व दुपारी २ ते संध्याकाळी ५ या वेळेत श्रीमद्भागवत कथा सुरू असून रात्री ८ ते १० या वेळेत कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज गुरुवार दि. ५ फेब्रुवारी रोजी वारी भैरवगड येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
दि. ६ फेब्रुवारी रोजी आळंदीचे ह.भ.प. कैलास महाराज येवले, तर दि. ७ फेब्रुवारी रोजी मुंबईचे ह.भ.प. चकोर महाराज बाविस्कर यांचे कीर्तन होणार आहे. दि. ७ रोजी दुपारी ४ वाजता श्रींची पालखी शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
८ फेब्रुवारीला प्रगटदिन सोहळा
संत गजानन महाराजांचा प्रगटदिन उत्सव दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता सुरू होणार असून श्रींचा रुद्राभिषेक होईल. सकाळी १० वाजता ह.भ.प. भागवत महाराज देशमुख यांचे काला कीर्तन व महाआरती, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, तर रात्री ७ वाजता “दरबार गजानन” हे संगीतमय संत गजानन महाराज नाट्य सादरीकरण होणार असून या कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप होईल.
जगत कल्याणासाठी भागवत – ह.भ.प. मंगेश महाराज वराडे
0
9
4
8
7
8
Users Today : 50
Leave a comment