विवाहितेचा छळ करणाऱ्या पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल | कारसाठी तीन लाखांची मागणी : शिवीगाळ, मारहाण व धमक्यांचा आरोप

Khozmaster
1 Min Read

नांदुरा, दि. ६ (प्रतिनिधी) :
विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती व सासूविरुद्ध ४ फेब्रुवारी रोजी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदुरा खुर्द येथील राखोंडे यांची कन्या आरती हिचा विवाह खेर्डा बुद्रुक (ता. जळगाव जामोद) येथील विजय विष्णू म्हसाळ याच्यासोबत झाला होता. विवाहाला आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही पती व सासूकडून घरगुती कारणावरून सतत शिवीगाळ, मारहाण, टोमणे मारणे तसेच मुलाबाळांसह घराबाहेर काढणे व जीवाने मारून टाकण्याच्या धमक्या देणे असे प्रकार सुरू असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

यासोबतच कार घेण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आणण्याची मागणी करून वेळोवेळी मानसिक व शारीरिक छळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या त्रासाला कंटाळून आरती विजय म्हसाळ यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला.

फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती विजय विष्णू म्हसाळ व सासू उर्मिला विष्णू म्हसाळ यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४९८(अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास अंमलदार रेखा सरोदे करीत आहेत.

0 9 4 8 7 8
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *