अमडापूरच्या बोरगाव काकडेत खुनी हल्ला | किरकोळ वादातून तुंबळ हाणामारी : चाकूने पोटावर वार, एक गंभीर जखमी : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Khozmaster
1 Min Read

अमडापूर, दि. ६ (प्रतिनिधी) :
किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत होऊन एका व्यक्तीवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना अमडापूर (ता. चिखली) पोलीस स्टेशन हद्दीतील बोरगाव काकडे येथे घडली. या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

बोरगाव काकडे येथील रहिवासी परमेश्वर प्रल्हाद साठे (वय ४५) यांच्या मुलाने रस्त्यावर मोटारसायकल उभी केली होती. याच दरम्यान आरोपी सागर सुनील काकडे याने आपल्या ट्रकने सदर मोटारसायकलला धडक दिल्याने दोन कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला. पुढे हा वाद चिघळत तुंबळ हाणामारीत रूपांतरित झाला.

तक्रारीनुसार आरोपी ज्ञानेश्वर गजानन काकडेसुनील इनकराव काकडे यांनी परमेश्वर साठे यांच्या मुलगा, पत्नी व मुलगी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान आरोपी रमेश गजानन काकडे याने हातातील चाकूने परमेश्वर साठे यांच्या पोटावर जबर वार केला.

या हल्ल्यात परमेश्वर साठे गंभीर जखमी झाले असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी परमेश्वर साठे यांनी अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सागर सुनील काकडे, ज्ञानेश्वर गजानन काकडे, सुनील इनकराव काकडे व रमेश गजानन काकडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५, ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

0 9 4 8 7 8
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *