संत गजानन महाराज पालखीचे भक्तिभावाने स्वागत | जांभोरा व पिंपळगाव सोनारा येथील दिंड्यांचे साखरखेर्ड्यात पूजन : ग्रामस्थांकडून चहापाणी व भोजनाची व्यवस्था

Khozmaster
1 Min Read

साखरखेर्डा, दि. ६ (प्रतिनिधी) :
दरवर्षीप्रमाणे यंदाही संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त शेकडो पायदळ दिंड्या शेगावकडे मार्गस्थ झाल्या असून गावोगावी या पालखी दिंड्यांचे भक्तिभावाने स्वागत केले जात आहे. याच अनुषंगाने साखरखेर्डा येथे ४ फेब्रुवारी रोजी जांभोरा व पिंपळगाव सोनारा येथील दिंड्या दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी पूजन करून भक्तिभावाने स्वागत केले.

जांभोरा येथील संत सावता माळी भजनी मंडळ यांची दिंडी ३ फेब्रुवारी रोजी जांभोरा येथून प्रस्थान झाली. दुसरबीड व मलकापूर पांग्रा येथे भाविकांनी दर्शन घेतले. पुढे नाथाभाऊ दराडे यांनी भोजन व निवासाची व्यवस्था केली. त्यानंतर सकाळी साखरखेर्डा येथे दिंडीचे आगमन होताच ग्रामस्थांनी चहापाण्याची व्यवस्था केली. तसेच माजी सरपंच सुनील जगताप यांनी भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था केली.

यावेळी सुमन सुनील जगताप, राम जाधव, ठाणेदार गजानन करेवाड, कमलाकर गवई, ललित अग्रवाल, व्ही. की. जगताप, पत्रकार अशोक इंगळे, दिलीप बेंडमाळी, दिलीप इंगळे, दादाराव गवई यांच्यासह अनेक भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

दरम्यान, पिंपळगाव सोनारा येथील फुलगिर बाबा मंडळ यांची पालखी दिंडी ३ फेब्रुवारी रोजी रात्री साखरखेर्डा येथील रोकडोबा हनुमान मंदिरात विसाव्यासाठी थांबली. याठिकाणी माजी सरपंच महेंद्र पाटीलपूनम महेंद्र पाटील यांनी संत गजानन महाराजांची आरती करून दर्शन घेतले तसेच सर्व भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था केली. यावेळी गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते. सकाळी वाजतगाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली.

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *