लोहार समाजाच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी | मेहकर फाटा परिसरात भक्तिमय वातावरण : ‘प्रभू विश्वकर्मा बहुउद्देशीय लोहार विकास संस्था’ स्थापन करण्याचा निर्णय

Khozmaster
2 Min Read

चिखली, दि. ६ (प्रतिनिधी) :
मेहकर फाटा परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सर्व लोहार बांधवांच्या उपस्थितीत धार्मिक व सामाजिक स्वरूपाचा हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन गजानन पोपळघट यांच्या शेतात करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात दुपारी १२.१५ वाजता प्रभू विश्वकर्मा पूजन व आरतीने झाली. दुपारी ४ वाजेपर्यंत भक्तिमय वातावरणात पूजा-विधी संपन्न झाले. उपस्थितांनी प्रभू विश्वकर्माच्या प्रतिमेचे पूजन करून व्यवसायातील प्रगती, सुख-समृद्धी तसेच समाजाच्या उन्नतीसाठी प्रार्थना केली. या कार्यक्रमात महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत पूजन विधीत सक्रिय सहभाग घेतला.


बहुउद्देशीय संस्था स्थापन करण्याचा निर्णय

या प्रसंगी लोहार समाजाच्या सामाजिक व धार्मिक कार्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. लोहार समाजासाठी मंदिर स्थापनेसह विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी बहुउद्देशीय संस्था स्थापन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. संस्थेचे नाव ‘प्रभू विश्वकर्मा बहुउद्देशीय लोहार विकास संस्था, चिखली’ असे ठेवण्यात आले.


संस्थेची कार्यकारिणी जाहीर

यावेळी संस्थेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यामध्ये
अध्यक्ष – राहुल कळसकर
सचिव – अरुण कळसकर
सहसचिव – नितीन कळसकर
उपाध्यक्ष – गजानन पोपळघट (भालगाव), शिवाजी पोपळघट (अमोना)
कोषाध्यक्ष – शिवाजी वाघ (शेळगाव आटोळ)
सहकोषाध्यक्ष – गोपाल कळसकर

संचालक – संजय हिवाळकर, रितेश ढासलेकर, प्रवीण परराव, संदीप हरणे, अमोल कळसकर, कृष्णा चापाईतकर, सुरेश वावधने यांची निवड करण्यात आली.


कार्यक्रमासाठी सहकार्य

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजेश ढासलेकर, दिलीप हरणे, राजेश वाघ, प्रकाश चव्हाण, नंदू कळसकर, विश्वंभर हरणे, दिनकर वाघ, प्रकाश पोपळघट, कमलेश तामस्कर, सुरेश पोपळघट, रामदास कळसकर यांनी सहकार्य केले.

0 9 4 8 7 8
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *