लोणार, दि. ६ (प्रतिनिधी) :
स्थानिक भगवान बाबा कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग अंतर्गत आयोजित विशेष निवासी शिबिराचा समारोप फेब्रुवारी महिन्यात पान येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
‘माझी वसुंधरा’ संकल्पनेवर आधारित या शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी विविध उपक्रम राबवून ग्रामविकासासाठी मोलाचे योगदान दिले. शिबिराच्या कालावधीत पडीक जमीन विकास, स्वच्छता, जनजागृती तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
या सात दिवसांच्या शिबिरात एकूण ७९५ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
समारोप कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जायभाये ग्रामसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र बोरसे होते.
यावेळी पोलीस पाटील आसाराम खोमणे, आत्माराम खरात, किशोर गावडे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश माळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. विठ्ठल भानुसे यांनी केले.
Users Today : 50