जऊळका येथील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात | विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव : सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांची दाद

Khozmaster
1 Min Read

जऊळका, दि. ६ (प्रतिनिधी) :
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, आपुलकी व आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने जऊळका येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दिनांक ५ फेब्रुवारी रोजी स्नेहसंमेलनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष गणेश साळवे होते. उद्घाटक म्हणून सरपंच गजानन मुंढे उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थितीत माजी उपसरपंच अनिता बुधवतअध्याताई कुडे उपस्थित होत्या.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कोळी गीत, आदिवासी नृत्य, देशभक्तीपर गीत तसेच वसंत गोरा कुंभार या नाटिकेचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे कार्यक्रमस्थळी अक्षरशः बक्षिसांचा पाऊस पडला.

विशेषतः चिमुकल्या मुलींनी सादर केलेल्या नृत्याने सर्व उपस्थित भारावून गेले. कार्यक्रमास पालक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी शरद भोकरे यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक पानोर, तिवारी, नेटके आदींनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद भोकरे यांनी केले.

दरम्यान पालकांनी पुढील काळात गावातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक भोकरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

0 9 4 8 7 8
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *