स्काऊट-गाईड मेळाव्यात जनता विद्यालयातील १९ विद्यार्थ्यांचा सहभाग | जिल्हास्तरीय मेळाव्यात विविध प्रात्यक्षिकांत विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

Khozmaster
1 Min Read

सैलानी, दि. ६ (प्रतिनिधी) :
सैलानी येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित जिल्हास्तरीय स्काऊट-गाईड मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून स्काऊट-गाईड विद्यार्थी सहभागी झाले होते.

या मेळाव्यात जनता विद्यालयातील १९ स्काऊट विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध उपक्रम व प्रात्यक्षिकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. तीन दिवस चाललेल्या या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी प्रथमोपचार, खेळ, कृतिकाम तसेच विविध कौशल्य आधारित उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

या मेळाव्यात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष रामकृष्ण आटे, सचिव प्रेमराज भाला, मुख्याध्यापक प्रनोर ठोंबरे, पर्यवेक्षक पिक तसेच शिक्षक-शिक्षिका व शाळेचे स्काऊटर शिक्षक प्रदेश माने यांनी मार्गदर्शन केले.

मेळाव्यात विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सहभाग घेत आपली कौशल्ये सादर करत शाळेचे नाव उज्ज्वल केले.

0 9 4 8 7 8
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *