साखरखेर्डा आणि डोणगावातून दोन महिला बेपत्ता | अवघ्या २४ तासांत दोन वेगवेगळ्या घटना : पोलिसांत मिसिंग दाखल : जिल्ह्यात बेपत्ता होण्याचे सत्र कायम

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा, दि. ६ (प्रतिनिधी) :
बुलढाणा जिल्ह्यातून मुली व महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. अवघ्या २४ तासांत डोणगाव आणि साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीतून दोन वेगवेगळ्या घटनांत दोन महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतून दररोज मुली व महिलांच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. दरम्यान पुन्हा दोन नवीन घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.


डोणगाव हद्दीत २० वर्षीय तरुणी बेपत्ता

पहिली घटना डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कनका (ता. मेहकर) येथे घडली आहे. सिताराम वसंत देवकर यांची २० वर्षीय मुलगी दिपाली सिताराम देवकर ही ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र तिचा कुठेही पत्ता लागला नाही.

दिपालीचा रंग सावळा, उंची सुमारे ४.५ फूट, केस लांब काळे असून तिने पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता व पायात गुलाबी सँडल होती. तिच्या उजव्या हातावर ‘पायल’ हे नाव गोंदलेले आहे.

या प्रकरणी पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार संजय घिकेआरीफ शेख करीत आहेत.


साखरखेर्डा हद्दीत ३८ वर्षीय महिला बेपत्ता

दुसरी घटना साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील पोखरी फाटा येथे घडली. गागलगाव येथील रहिवासी गजानन प्रल्हाद म्हस्के हे आपली बहीण शिवकन्या विनोद सास्ते (वय ३८) हिची प्रकृती ठीक नसल्याने तिला माहेरी घेऊन जात होते.

प्रवासादरम्यान पोखरी फाट्याजवळ बहिणीला चक्कर आल्याने गजानन यांनी वाहन थांबवून पाणी आणण्यासाठी थोड्या वेळासाठी गेले असता, बहीण अचानक गायब झाल्याचे दिसून आले.

शिवकन्येचा रंग गोरा, चेहरा गोल, उंची सुमारे ५.५ फूट, बांधा मजबूत असून तिने गुलाबी साडी व लाल ब्लाउज परिधान केला होता. तिच्या हातावर ‘गजानन’ हे नाव गोंदलेले आहे.

या प्रकरणीही मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार कडुबा डोईफोडेरामदास वैराळ करीत आहेत.

0 9 4 8 7 8
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *