विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या जिल्हाध्यक्षपदी दामोदर शर्मा मिशन-२०२७ अंतर्गत संघटन बळकटीसाठी नियुक्ती

Khozmaster
1 Min Read

मलकापूर, दि. ६ (प्रतिनिधी) :
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या (विराआंस) मिशन-२०२७ अंतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ व धडाडीचे शेतकरी नेते दामोदर शर्मा (रा. मलकापूर) यांची बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती ४ फेब्रुवारी २०२६ रोजी समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत जाहीर करण्यात आली. या बैठकीस महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रंजनाताई मामर्डे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्राचार्य डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत, पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष अॅड. सुरेश वानखडे, कोअर कमिटी सदस्य डॉ. पद्माताई राजपूत, शेतकरी नेते देवीदास कणखर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. वंदनाताई काकडे, माजी जिल्हाध्यक्ष तेजराव मुंडे, कैलास फाटे आदी प्रमुख उपस्थित होते.

याच बैठकीत मेहकर येथील राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. बिशनसिंह चौधरी यांची जिल्हा संघटकपदी, तर प्रा. प्रेम खासबागे यांची युवा आघाडी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.

या प्रसंगी विराआंसच्या पदाधिकाऱ्यांनी मिशन-२०२७ अंतर्गत पृथक विदर्भ राज्याचा लढा निर्णायक टप्प्यापर्यंत नेण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. संघटनात्मक ताकद वाढवून शेतकरी, युवक व महिलांना आंदोलनात सक्रिय सहभागी करून घेण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

0 9 4 8 6 4
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *