मोताळा (प्रतिनिधी) :
तालुक्यातील राजूर येथे संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी उदयकार कुटुंबीय, गावकरी व शिववंश मित्र मंडळ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राजूर येथे प्रकटदिन उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार असून सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान राजूर व शिरवा येथील टाळकरी व भजनी मंडळींच्या सहभागाने कलशयात्रा व दिंडी सोहळा काढण्यात येणार आहे.
यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत ह.भ.प. कृष्णामहाराज सुरडकर (भालेगाव) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन विनोद सुखदेव उदयकार, सुनीता विनोद उदयकार, तसेच गावकरी व शिववंश मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Users Today : 36