थकीत करापोटी उत्तर झोनमधील दोन मालमत्तांवर सीलची कारवाई महानगरपालिकेची गांधी चौक व गांधी रोड परिसरात धडक मोहीम

Khozmaster
1 Min Read

अकोला, दि. ६ (प्रतिनिधी) :
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील उत्तर झोन अंतर्गत थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महानगरपालिकेकडून कठोर कारवाई करण्यात आली. आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त विजय पारतवार आणि सहाय्यक आयुक्त विठ्ठल देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली थकीत कर असलेल्या दोन मालमत्तांवर सील लावण्याची कार्यवाही करण्यात आली.

उत्तर झोन अंतर्गत गांधी चौक येथील दर्याव हाईट्स मधील वार्ड क्र. उ-१, मालमत्ता क्र. ७३५ (धारक – पवनकुमार व राजेशकुमार जगदीशप्रसाद गोयनका) यांच्याकडे सन २०१७-१८ पासून आजपर्यंत ३ लाख २ हजार ३८४ रुपये इतका मालमत्ता कर थकीत होता.

तसेच गांधी रोड येथील मालमत्ता क्र. ७४२ (धारक – सुरेश व संतोष गणपतलाल केदारमल अग्रवाल) यांच्याकडेही सन २०१७-१८ पासून आजपर्यंत ३ लाख ३२ हजार ९२० रुपये इतका कर थकीत असल्याने संबंधित मालमत्तांवर सीलची कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान सहाय्यक अधीक्षक पंकज जोगळेकर, श्रीमती रंजना आंधळे, वरिष्ठ लिपिक हेमंत शेळवणे, लिपिक संतोष गाडेकर, मोहन घाटोळ, सुरक्षा रक्षक बाली इंगळे आदी कर्मचारी उपस्थित होते.

0 9 4 8 6 4
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *