अकोला, दि. ६ (प्रतिनिधी) :
उम्मीद फाउंडेशन व सीनियर सिटीझन भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या वतीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा त्यांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करून सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तसेच सामान्य नागरिकांप्रती संवेदनशील दृष्टिकोन ठेवून कार्य केल्याबद्दल पोलीस अधीक्षक चांडक यांचे विशेष कौतुक केले. यासोबतच भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी उचललेल्या प्रभावी पावलांबद्दलही उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमास उम्मीद फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष तसेच पूज्य सिंधी जनरल पंचायतचे माजी अध्यक्ष कन्हैयालाल रंगवानी, फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार अॅड. प्रणव पाटील, कोडुमल चावला, सुरेश संतानी, हरीश पारवानी, प्रेम आनंदानी, मोहन नागवानी, राहुल संतानी, मारुती देवनाळे, अॅड. काळदाते मॅडम, अॅड. सौ. बुंदेले, अॅड. अभिषेक गौतम, अॅड. दीपा जानूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Users Today : 36