शासनाच्या आरोग्य योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा डॉ. मोहन गोरे यांचे आवाहन; रक्त तपासणी व मोफत औषधी वितरण

Khozmaster
1 Min Read

वाशीम, दि. ६ (प्रतिनिधी) :
राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या वतीने गोरगरीब मजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी आरोग्य विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत असून, या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन एम.एम.यू. (मोबाईल मेडिकल युनिट) चे डॉ. मोहन गोरे यांनी केले.

मालेगाव तालुक्यातील अमानी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ३० व ३१ जानेवारी रोजी बांधकाम कामगार मजुरांची रक्त तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान महिला व पुरुष कामगारांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचार तसेच मोफत मार्गदर्शन देण्यात आले.

या उपक्रमात समन्वयक अनिकेत जनबंधू, डॉ. मोहन गोरे यांच्यासह नर्स सीमा कांबळे, शुभांगी जाधव, सिद्धार्थ खाडे यांनी रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार उपलब्ध करून दिला. आरोग्य विभागाच्या माध्यमातून रक्त तपासणीनंतर बांधकाम कामगारांसाठी मोफत औषधांचे वितरणही करण्यात आले.

ग्रामीण व वंचित घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने वाशीम बांधकाम कामगार कल्याण आरोग्य विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. मोबाईल मेडिकल युनिटच्या सहाय्याने गावातच तपासणी व उपचार उपलब्ध झाल्यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला.

कामगारांना आरोग्य तपासणीसाठी शहरात जाणे अनेकदा शक्य होत नसल्याने गावातच आरोग्य सेवा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. रक्त तपासणी अहवालानुसार काही कामगारांमध्ये रक्तक्षय, थकवा, पोषणअभाव तसेच इतर किरकोळ आजारांचे निदान झाले.

0 9 4 8 6 4
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *