माता रमाई म्हणजे समर्पण, संघर्ष आणि त्यागाचे प्रतीक : घुगे

Khozmaster
1 Min Read

वर्दडी बुद्रूक, दि. ७ (प्रतिनिधी)
भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधीसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी त्यागमूर्ती माता रमाई बाबासाहेब आंबेडकर या समर्पण, संघर्ष आणि त्यागाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन आंबेडकरी विचारधारेचे गाढे अभ्यासक तथा सहायक शिक्षक संदीप घुगे यांनी केले.

येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी शाळेतील चिमुकल्या मुलींनी माता रमाई यांची वेशभूषा साकारून कार्यक्रमात विशेष रंगत आणली. विद्यार्थिनी सानिका स्वामीनंदन साळवे हिने आपल्या सुरेल आवाजात माता रमाई यांच्या जीवनावर आधारित “तिच्या हिमतीने घडलाय इतिहास नवा, तेव्हा बहुजनांच्या घरामध्ये लागलाय दिवा” हे गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या शिक्षिका उज्ज्वला खंदारे होत्या. यावेळी मुख्याध्यापक टी. के. देशमुख तसेच शिक्षक संतोष साबदे यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शिक्षक संतोष राठोड यांनी माता रमाई यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा आयोजित केली.

कार्यक्रमाचे संचालन परी गजानन साळवेसानिका स्वामीनंदन साळवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

यानंतर येथील ग्रामपंचायत कार्यालयात माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच मधूकर इनकर, उपसरपंच ज्ञानेश्वर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 8 6 4
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *