नागसेन बुद्धविहारामध्ये माता रमाई जयंती उत्साहात साजरी

Khozmaster
1 Min Read

चिखली, दि. ७ (प्रतिनिधी)
भारतीय बौद्ध महासभा, चिखली तालुक्याच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती नागसेन बुद्धविहार येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य सदाशिव खिल्लारे हे होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आर. एस. जाधव, व्ही. बी. साळवे तसेच तालुका प्रचार-पर्यटन सचिव मधुकर भिसे उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष सदाशिव खिल्लारे यांनी आपल्या भाषणात माता रमाई यांचे जीवन संघर्षमय असून त्यांनी सोसलेल्या कष्टांना तोड नाही, असे सांगितले. माता रमाई या कोटी-कोटींची आई असून त्यांच्या महान त्यागामुळेच भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडले, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाधान जाधव, प्रल्हाद इंगळे, पाटोदा येथील माजी सरपंच गवई, किन्ही सवडत येथील गवई, मधुकर मिसाळ, शंकर जाधव, गुलाबराव साळवे, नारायण खंडारे, सखाराम वानखेडे, शेषराव हिवाळे, शेषराव गवई, हिंमतराव कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका उपाध्यक्ष बौद्धाचार्य सुधाकर मघाडे यांनी केले. सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस दीपक कस्तुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका उपाध्यक्ष संरक्षण विलास जाधव यांनी केले.

0 9 4 8 6 1
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *