मोताळा, दि. ७ (प्रतिनिधी) –
मलकापूर–बुलढाणा मार्गावरील राजस्थान मार्बलसमोर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन एका व्यक्तीस गंभीर दुखापत झाली असून दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना ७ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. जखमींवर मोताळा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, बोराखेडी ग्रामपंचायत हद्दीतील बुलढाणा अर्बन बँकेजवळ राहणारे अजय किसन खर्चे (वय ५५) हे आपल्या एमएच २८ बीआर ८७४८ क्रमांकाच्या स्कूटीवरून बुलढाणा–मलकापूर मार्गाने जात होते. दरम्यान राजस्थान मार्बलजवळ त्यांच्या स्कूटीची एमएच २८ एव्हाय ३२०३ क्रमांकाच्या दुचाकीशी समोरासमोर धडक झाली.
या अपघातात अजय खर्चे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे सांगण्यात आले. तसेच दुसऱ्या दुचाकीवरील वैभव कैलास बावस्कर (रा. कोथळी) आणि मंदा कृष्णा पुरकर (रा. नरवेल) हे दोघे किरकोळ जखमी झाले.
जखमींवर मोताळा येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर किरकोळ जखमींना जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले. तर गंभीर जखमी अजय खर्चे यांच्यावर बुलढाणा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Users Today : 32