जनता कॉन्व्हेंटचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Khozmaster
1 Min Read

मोताळा, दि. ७ (प्रतिनिधी)
मोताळा तालुक्यातील तळणी येथील जनसेवा शिक्षण मंडळ समितीद्वारे संचालित जनता कॉन्व्हेंट, तळणी येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चे वार्षिक स्नेहसंमेलन ६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी अंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान योजनेंतर्गत जनता हायस्कूल, तळणी येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा बुलढाणा नगराध्यक्षा पूजाताई संजय गायकवाड यांच्या हस्ते पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनसेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिलीपराव नाफडे हे होते. यावेळी धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमात शेषराव बोदडे यांच्या हस्ते शाळा समितीच्या वतीने नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड यांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

यामध्ये सामान्य ज्ञान स्पर्धेतील पायल ज्ञानेश्वर लोखंडेरेवती देविदास चोपडे, तसेच दहावीतील गुणवंत विद्यार्थी कुणाल राजेंद्र नाफडे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास शिवसेना नेते बाळाभाऊ नारखेडे, अरविंद पाटील, शाखाप्रमुख प्रशांत नाफडे, किसान सेना तालुकाप्रमुख संजय नारखेडे, विकास पाटील, पोलीस पाटील, गजानन पाटील, श्रीकृष्ण लांडे, प्रकाश पांडे, मीनाताई शिंदे, मोताळा तालुका संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर वाघ यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 8 6 1
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *