रामनगरात गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात हजारो भक्तांनी घेतला दर्शन व महाप्रसादाचा लाभ

Khozmaster
2 Min Read

मेहकर, दि. ८ (प्रतिनिधी) :
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, मेहकर शहरातील रामनगर व लक्ष्मीनारायण नगर येथील संत गजानन महाराज मंदिरातही प्रकटदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने हजारो भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला.

संत गजानन महाराजांची महती देश-विदेशात पोहोचलेली असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रकटदिन मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. रामनगर व लक्ष्मीनारायण नगर येथील नागरिकांनी एकत्र येऊन उभारलेल्या या मंदिरात दि. ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान गजानन विजय ग्रंथ पारायण वाचन कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला.

प्रकटदिनानिमित्त रविवारी दुपारी १२ वाजता मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे व नगरसेविका रूपाली किशोर गारोळे यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. यावेळी प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका रूपाली मनोज जाधव, माजी नगरसेवक मनोज जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नगरपरिषद आरोग्य सभापती नीलिमा शरद सोमण यांनीही श्रींचे दर्शन घेतले.

महाआरतीनंतर शिवसेनेचे युवा नेते नीरज संजय रायमूलकर यांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

या कार्यक्रमासाठी मंदिराचे अध्यक्ष नारायण काबरा तसेच विश्वस्त प्रकाश सास्ते, अमोल पुरी, विष्णू खंदारकर, प्रशांत शर्मा, सुरेश धुदाट, रमेश गाडेकर, संजय धुदाट, बाळासाहेब देशमुख, सागर तांगडे, पांडुरंग कुडमेथे, संजय रोडे, अक्षद गजानन जाधव, दिनेश जांगिड, सुभाष रिंढे, केशव गिरी, गजानन सौभागे, राजू डोंगरदिवे, संजय खंडारे, किशोर झिने, कैलास गिरी, निलेश दायमा, राजेंद्र गुंगे, संजय जुमडे, सुजित दंडे, गणेश राठोड, विश्वनाथ गिरी यांच्यासह अनेक सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. सकाळच्या सत्रात शिवकन्या शेळके यांनी गजानन महाराज पोथी पारायण वाचन केले. तसेच राम महाराज जोशी वेणीकर यांनी सकाळी पौरोहित्य पार पाडले.

रामनगर येथील निवासी माजी आमदार संजय रायमुलकर यांनीही मंदिरात भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले व महाप्रसाद ग्रहण केला. संपूर्ण परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण राहून भाविकांनी श्रद्धेने सहभाग नोंदविला.

0 9 4 8 6 1
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *