सिंदखेडराजा येथे ठिकठिकाणी संत गजानन महाराजांचा प्रगटदिन उत्साहात हजारो भाविकांनी घेतला दर्शन व महाप्रसादाचा लाभ

Khozmaster
2 Min Read

सिंदखेडराजा, दि. ८ (प्रतिनिधी) :
शेगावचे राणा संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन सिंदखेडराजा परिसरात विविध ठिकाणी ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविक-भक्तांनी श्रींचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला.

सिंदखेडराजा येथील जुना कोर्टाच्या पाठीमागील संत गजानन महाराज मंदिरात हजारो भाविकांनी दर्शन घेतले तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच धनगर गल्लीतील संत गजानन महाराज मंदिरातही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

आढाव गल्ली येथे लक्ष्मण आढाव यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत गजानन महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त महापंक्तीचे आयोजन केले. या प्रसंगी हजारो भाविकांनी महाप्रसाद ग्रहण केला.

शिवशक्ती नगर येथे गजानन भक्त संजय सोनुणे यांनी सालाबादप्रमाणे प्रगटदिनानिमित्त महाप्रसाद वाटपाचे आयोजन केले. तसेच महालक्ष्मी रेसिडेन्सी येथील संत गजानन मंदिरात प्रगटदिनानिमित्त महापूजा करण्यात आली.

याशिवाय छगनदादा मेहेत्रे यांच्या घरासमोरील गजानन महाराज मंदिरात गल्लीतील मित्र परिवारांनी एकत्र येऊन महाप्रसादाचे आयोजन केले. तसेच डॉ. संजय मेहेत्रे यांनी शेतामधील निसर्गरम्य ठिकाणी संत गजानन महाराजांच्या फोटो छत्रीसमोर महापूजा करून भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले.

संपूर्ण सिंदखेडराजा शहरामध्ये विविध ठिकाणी प्रगटदिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवत “जय गजानन” च्या जयघोषात परिसर भक्तिमय केला.


भिक्खू संघास चिवरदानसह अष्ट पुरस्कारदान कार्यक्रम संपन्न

रमाबाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त चोपडे परिवाराचा उपक्रम

मलकापूर, दि. ८ (प्रतिनिधी) :
त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीचे औचित्य साधून चोपडे परिवाराच्या वतीने भिक्खू संघास चिवरदानसह अष्ट पुरस्कारदान कार्यक्रम दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमात पु. भंते स्वरानंद, पु. भंते मोगलायन, पु. भंते संघपाल, पु. भंते धम्मज्योती, पु. भंते काश्यप यांना चिवरदान तसेच अष्ट पुरस्कारदान करण्यात आले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेश इंगळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. अशोक सुरळकर, भीमगर्जना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भिवा चोपडे, धम्मसेवक बाबुराव वाकोडे, मधुकर निकम, येडू इंगळे, आर. डी. जाधव, श्याम चोपडे तसेच शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते रवींद्र गवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमाबाई महिला मंडळ वडोदा तसेच पंचशील महिला मंडळ गौतम नगर यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम शांततामय व उत्साहात पार पडला.

0 9 4 8 6 0
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *