ढोरवी येथे माता रमाबाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी मिरवणूक, पूजन व केक कापून जयंतीचा आनंदोत्सव

Khozmaster
2 Min Read

मलकापूर पांग्रा, दि. ८ (प्रतिनिधी) :
जवळील ढोरवी येथे सर्व समाजाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाबाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी सर्व समाजाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर रात्री ८ वाजता माता रमाबाई, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बोधिसत्व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन गावचे प्रथम नागरिक सरपंच नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर लहान मुलांच्या हस्ते केक कापून जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान गावातील ज्येष्ठ नागरिकांनी आपले विचार व्यक्त केले. या जयंती उत्सवासाठी चंद्रकांत सजावट यांनी विशेष योगदान दिले.

या कार्यक्रमाला सुदाम पवार, रमेश पिंपळे, संतोष सोनपसारे, प्रदीप ढाकरके, धनंजय मुरकुट, शुभम मुरकुट, शरद सोनपसारे, निखिल मुरकुट, शिवानंद शेळके, लखन मुरकुट, योगेश भुसारी, अशोक पवार, पत्रकार ज्ञानेश्वर कळकुंबे यांच्यासह इतर मान्यवर व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


उपविभागीय अधिकारी काळे शेतकऱ्यांच्या बांधावर

धामणगाव शिवारात केळी पिकावर मार्गदर्शन, शेतकऱ्यांशी साधला संवाद

संग्रामपूर, दि. ८ (प्रतिनिधी) :
तालुक्यातील धामणगाव शिवारातील बांधावर उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी भेट देत केळी पिकाबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी केळी लागवड, उत्पादन, जमीन निवड, खत व्यवस्थापन, पाणी नियोजन तसेच रासायनिक फवारणी यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

केळी पिकाच्या यशस्वी लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक असून फेब्रुवारी महिन्यात लागवड करणे अधिक योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उती संवर्धित रोपांचा वापरठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.

अधिक उत्पादनासाठी योग्य प्रमाणात खते, लागवडीतील अंतर, फुट नियंत्रण, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा (बोरॉन) वापर व वेळेवर किडींचे नियंत्रण गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच घड पूर्णपणे पक्के झाल्यावरच कापणी करावी, असेही त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

केळी पिकासंदर्भात प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने धामणगाव येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मंडळ अधिकारी उमाशंकर बुरजे, ग्राम महसूल अधिकारी अविनाश खरे, महसूल सेवक थुकेकर, धामणगाव ग्रामपंचायत सरपंच शुभांगी विठ्ठल गोतमारे, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 8 6 0
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *