माता रमाबाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी आंबेडकर नगरात अभिवादन, गावातून प्रतिमेची मिरवणूक

Khozmaster
1 Min Read

साखरखेर्डा, दि. ८ (प्रतिनिधी) :
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ माता रमाई यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रशेखर शुक्ल होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच ज्योती जाधव, राम जाधव, महेंद्र पाटील, उपसरपंच संग्रामसिंह राजपूत, ठाणेदार गजानन करेवाड, संतोष मंडळकर, अंकुर देशपांडे, संदीप मगर, देवानंद खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप इंगळे यांनी केले.

त्यानंतर दुपारी ३ वाजता गावातून माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत कमलाकर गवई, सुधाकर गवई, अर्जुन गवई, के. व्ही. गवई, सुभाष गवई, संदीप खिल्लारे, दादाराव गवई, ईश्वर गवई यांच्यासह शेकडो युवक व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

जयंती कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

0 9 4 8 6 0
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *