जळगाव जामोद, दि. ८ (प्रतिनिधी) :
बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपळगाव काळे येथे दि. ५ ते ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान चार दिवशीय कौशल्य विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. ही कार्यशाळा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सलीम पटेल, सहसचिव रब्बानी देशमुख, उपाध्यक्ष प्रा. कय्यूम पटेल, संचालक सिराजोद्दीन पटेल तसेच प्राचार्य डॉ. शत्रुघ्न जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली.
महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करून त्यांना नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने सक्षम बनविणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. यामध्ये विद्यापीठातील प्रशिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांना दहा विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यापीठाचे प्रशिक्षक डॉ. उमेश चापके यांनी विद्यार्थ्यांना मौखिक संवाद व गैर-मौखिक संवाद या विषयांवर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी प्रशिक्षक डॉ. ज्ञानशील खंडेराव यांनी वेळेचे व्यवस्थापन, प्रेरणा आणि ध्येय निश्चिती या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले.
तिसऱ्या दिवशी दर्यापूर येथील प्रशिक्षक डॉ. हरिदास आखरे यांनी चारित्र्य, नैतिकता, सादरीकरण व गटचर्चा यावर मार्गदर्शन केले. तसेच शेगाव येथील प्रशिक्षक डॉ. हर्षाली पाटील यांनी बायोडाटा लेखन व मुलाखततंत्र या विषयांवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.
समारोपीय कार्यक्रमात प्रगती गायकवाड, निकिता मोरे, साक्षी इंगळे, गायत्री आदी विद्यार्थिनींनी कार्यशाळेबाबत अभिप्राय व्यक्त केला. यावेळी प्राचार्य डॉ. शत्रुघ्न जाधव यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना कार्यशाळेचा उपयोग भविष्यात करिअर घडविण्यासाठी निश्चितच होईल, असे सांगितले.
या चार दिवशीय कार्यशाळेचे संचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. बाबाराव सांगळे यांनी केले.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. शेख फराह, डॉ. महेश नेतनासकर, डॉ. नूर मोहम्मद, डॉ. चेतन पलन, डॉ. निखिल अग्रवाल, डॉ. आनंद जाधव, प्रा. मनोहर जांभळे, प्रा. नितीन आसोले, डॉ. शकील खान, डॉ. प्राजक्ता बाठे, डॉ. दिपाली सिरसाठ, प्रा. सय्यद जोया, गजानन इंगळे, डॉ. गजानन भोपळे, परेश अवचार यांनी विशेष परिश्रम घेतले
Users Today : 32