वर्दडीत मोफत सर्व रोगनिदान शिबिर उत्साहात संपन्न जिल्हा परिषद शाळेत २७८ रुग्णांची तपासणी, शेकडो गरजूंनी घेतला लाभ

Khozmaster
1 Min Read

वर्दडी बुद्रूक, दि. ८ (प्रतिनिधी) :
येथील जिल्हा परिषद शाळेत दि. ८ फेब्रुवारी रोजी मोफत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध आजारांवर मोफत तपासणी व निदान करण्यात आल्याने शेकडो गरजू नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

हे शिबिर संजिवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रा. डी. आर. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रामप्रसाद लोहकरे व संदीप कापडे यांनी आयोजित केले होते.

शिबिराचे उद्घाटन प्रा. डी. आर. चव्हाण व संजिवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. बळीराम बागल यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरामध्ये मेंदूविकार, पाठदुखी, हृदयरोग व दुर्धर आजार, मूत्ररोग व किडनी विकार, छातीचे विकार व क्षयरोग, महिलांचे आजार, लहान मुलांचे आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड समस्या, पोटदुखी-अॅसिडिटी, कंबरदुखी, डोकेदुखी, मानसिक आजार आदी विविध आजारांवर मोफत तपासणी करून निदान करण्यात आले.

या शिबिरात डॉ. बळीराम बागल व डॉ. कैलास राजगुरू यांच्यासह इतर डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन केले. शिबिराच्या माध्यमातून एकूण २७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

शिबिर यशस्वी करण्यासाठी आयोजक रामप्रसाद लोहकरे, संदीप कापडे यांच्यासह गावातील तरुणांनी विशेष परिश्रम घेतले.

0 9 4 8 6 0
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *